प्रिन्स चार्ल्स यांच्यानंतर आता ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनाही कोरोनाची लागणं

corona

टीम महाराष्ट्र देशा – प्रिन्स चार्ल्स यांच्यानंतर आता ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. जॉनसन यांना प्राथमिक लक्षण दिसून आल्यानंतर त्यांची चाचणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याच स्पष्ट झालं आहे.

५५ वर्षीय जॉनसन यांनी स्वतः ट्वीटरवर ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय आपल्याला काही प्राथमिक लक्षणं दिसु लागली होती आणि नंतर चाचणीत कोरोना झाल्याच्या गोष्टीला पुष्टी मिळाली आहे. आपण आता इतरांपासून स्वतःला वेगळ करून घेत आहोत आणि तेच यावेळी सगळ्यात योग्य आहे. असही ते म्हणाले.

तसेच आपण घरातच राहणार असून येथूनच आपण आपल्या पंतप्रधानपदाच्या कर्तव्यांच पालन करणार आहोत आणि सरकारकडून कोरोनाशी सुरु असलेल्या लढ्याचं आपण नेतृत्व करणार आहोत असही त्यांनी म्हंटलं आहे. आपण सगळे एकत्र येऊन या स्थितीवर विजय मिळवू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलं आहे.

ते ट्वीटरवर म्हणाले, ‘गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाची काही  सौम्य लक्षणे माझ्यात दिसून आली आहेत आणि त्यानंतरच्या चाचणीत कोरोना व्हायरसची लागण झाल्याची पुष्टी मिळाली. मी आता स्वत: ला वेगळं करत आहे, परंतु आम्ही या विषाणूविरूद्ध लढत असताना व्हिडिओ-कॉन्फरन्सद्वारे सरकारच्या प्रयत्नांचे मी नेतृत्व करत राहीन. एकत्रितपणे आपण याच्यावर विजय मिळवू. #StayHomeSaveLives’

हेही पहा –

IMP