ब्रिटीश सेन्सोरकडून ‘पद्मावती’ला हिरवा कंदील

टीम महाराष्ट्र देशा: भारतामध्ये संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती या चित्रपटाला जोरदार विरोध होताना दिसत आहे. तर तांत्रिक बदलांचे कारण देत भारतीय सेन्सॉर बोर्डाने चित्रपट निर्मात्यांकडे परत पाठवला आहे. मात्र ‘द ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन’ने (ब्रिटिश सेन्सॉर बोर्डा) याला हिरवा कंदील दिला आहे. विशेष म्हणजे भारतात चित्रपटातील दृश्यावर अनेक आक्षेप घेण्यात आले असताना ब्रिटिश सेन्सॉरकडून कोणतीही कात्री लावण्यात आलेली नाही.

पद्मावती चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप राजपूत संघटनांकडून करण्यात येत आहे. दरम्यान मध्यप्रदेश, पंजाब, राजस्थान तसेच गुजरातमध्येही ‘पद्मावती’वर बंदी घालण्यात आली आहे.