मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने राज्यभरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या, पण त्यानी शिवसेना पक्षप्रमुख उल्लेख टाळला. गेल्या महिन्यात, एकनाथ शिंदे आणि 40 शिवसेना आमदार आणि 10 अपक्षांनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड केले होते. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. या बंडखोर आमदारांना परत आणण्यासाठी शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त विनंती केली आहे.
दीपाली सय्यद म्हणाल्या, “शिवसेना आमचे कुटुंब त्याचे कुटुंबप्रमुख तुम्ही. भगवा डौलाने फडकवावा, त्या धनुष्यबाणाचे पाईक आम्ही. या शुभप्रसंगी रुसलेल्या, चुकलेल्या सैनिकांना माफ करा तुम्ही. शिवसेना एकत्र करा तुम्ही”
@OfficeofUT pic.twitter.com/UjVRkx7BPo
— Deepali Sayed (@deepalisayed) July 27, 2022
एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेवर दावा
अलीकडेच शिवसेनेच्या 19 पैकी 12 लोकसभा सदस्यांनीही एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने आमदारांनी बंडखोरी केली. शिंदे यांनी नुकतीच त्यांच्या गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी स्थापन केली असून त्यांनी मूळ शिवसेना असल्याचा दावा केला आहे.
निवडणूक आयोगाकडे पक्षाच्या चिन्हाचा मुद्दा
16 बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात न्यायालयीन लढाई सुरू आहे. याशिवाय दोन्ही गटांनी पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत आपले दावे भारतीय निवडणूक आयोगासमोर मांडले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut : “ये दोस्ती….हम नही तोडेंगे”, संजय राऊतांच्या उध्दव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
- Sanjay Raut | बाळासाहेब ठाकरे यांनी माकडांची माणसे केली – संजय राऊत
- Udhdav Thackeray : “उद्या हे महाशय स्वतःला नरेंद्र मोदी समजतील आणि…”, उध्दव ठाकरेंचा शिंदेंना टोला
- Udhdav Thackeray : एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाच्या ऑफरबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…!
- Chandrakant khaire | बंडखोर आमदारांनी बाळासाहेबांचा शेवटचा आदेश का पळाला नाही – चंद्रकांत खैरे
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<