“पंतप्रधान देशसेवा करत आहेत. ज्याला भुंकायचंय त्याने भुंकावे”

टीम महाराष्ट्र देशा- पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यावरून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत असलेल्या आणि टीकेची झोड उठवत असलेल्या काँग्रेसवर भाजपा खासदार बृजभूषण शरण यांनी ‘एएनआय’शी बोलताना जोरदार पलटवार केला आहे. कुत्रे भुंकत असतात आणि हत्ती आपली मस्त चाल चालत असतो. पंतप्रधान देशसेवा करत आहेत. ज्याला भुंकायचंय त्याने भुंकावे, अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधींवर टीका केली.

काय म्हणाले खासदार बृजभूषण शरण

घोटाळ्यावर बोलण्याचा काँग्रेसला अधिकार नाही. कारण हे सर्व त्यांच्याच सरकारच्या कालावधीत सुरू झाले आहे. राहुल गांधींना यावर बोलण्याचा अधिकार नाही. कारण त्यांच्या काळातच हे सुरू झाले होते. सरकारने आता कारवाई सुरू केली आहे. आता हा घोटाळा उजेडात आला आहे. त्यानंतर रॉबर्ट वड्राही पकडले जातील. कदाचित त्यांची आई (सोनिया) किंवा ते स्वत:ही यात फसू शकतात मग ते ओरडतील. कुत्रे भुंकत असतात आणि हत्ती आपली मस्त चाल चालत असतो. पंतप्रधान देशसेवा करत आहेत. ज्याला भुंकायचंय त्याने भुंकावे.

You might also like
Comments
Loading...