दारूच्या नशेत झिंगलेल्या नवऱ्या मुलाला पाहून नवरीने उचलले हे टोकाचे पाऊल

blank

टीम महाराष्ट्र देशा : हुंड्यामुळे आजपर्यंत अनेकदा मुलींची लग्न मोडल्याचे आपण पहिले आहे. तर लग्न मोडल्यास बदनामी होईल म्हणून कितीतरी मुली गप्प बसून लग्नाला तयार होतात. मात्र उत्तर प्रदेशातील लखीमपूर मध्ये एका नवरीने ऐन लग्नात नवऱ्या मुलाशी लग्न करण्यास नकार दिला आहे. लग्नाला नकार दिलेल्या नवरीचे नाव पूजा असे आहे.

ऐन लग्नात दारूच्या नशेत झिंगलेल्या नवऱ्यामुलाला पाहताच पूजाने अचानक लग्नाला नकार दिला. तिने अचानक लग्नाला नकार दिल्याने त्या ठिकाणी एकाच खळबळ उडाली होती. नातेवाईकांसह पोलीसांनीही पूजाला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली आणि लग्नाला नकार दिला. त्यामुळे नवरदेव आल्या पावली वरात घेऊन निघून गेला.

नवरामुलगा दारूच्या नशेत आकंठ बुडाला होता. आज आपलं लग्न आहे याचेही त्याला भान नव्हते. तसेच नवरदेवाच्या आईवडिलांनी तिच्या आईवडिलांना हुंडा मागितला होता. हे सर्व सहन न झाल्यामुळे मी लग्न मोडले असल्याचे तिने एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या :