माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी आणि त्याच्या पत्नीविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल

मुंबईः माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी आणि त्याच्या पत्नीविरोधात एका व्यक्तीनं मारहाणीचा केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. 58 वर्षांच्या पीडित राजेंद्र कुमार तिवारी यांनी या प्रकरणात पोलिसांत एफआयआर दाखल केलं आहे. राजेंद्रकुमार हे निवृत्त बँक कर्मचारी असून, त्यांचे पुत्र पेशानं व्यावसायिक आहेत. या प्रकरणात बांगुरनगर पोलीस स्टेशनमध्ये आयपीसी कलम 504 आणि कलम 323 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मॉलमध्ये गर्दी असल्यानं चालताना चुकून राजेंद्र कुमार यांचा हात कांबळीच्या पत्नीला लागला. त्यामुळे त्यांना मारहाण करण्यात आली आहे. रविवार असल्यानं मॉलमध्ये वर्दळ होती. माझे वडील माझ्या मुलीला गेमिंग झोनकडून फूड कोर्ट घेऊन चालले होते. याच दरम्यान ही घटना घडली. माझ्या वडिलांनाही कांबळीच्या पत्नीला स्पर्श झाला ते कळालं नव्हतं, अशी माहिती राजेंद्र कुमार यांचा मुलगा अंकुरनं दिली आहे.

त्यानं माझ्या वडिलांच्या तोंडावर मुक्का मारला, माझ्या वडिलांनाही काय होतंय हे समजलं नाही. त्यानंतर त्यांनी फूड कोर्ट येथे आल्यानंतर सर्व वृत्तांत सांगितला, असंही अंकुर म्हणाला आहे. मी कांबळी जवळ गेलो तेव्हा त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी कांबळीनं मलाही धक्का दिला आणि शिवीगाळ केली. कांबळीच्या पत्नीनं पायातली सँडल काढली आणि मला मारहाण करण्यास सुरुवात केली. माझ्याकडून चुकून धक्का लागल्याचं मी त्यांना सांगितल्यानंतरही तिनं मला शिवीगाळ सुरूच ठेवली, असा वृत्तांत राजेंद्र यांनी सांगितला. या प्रकारानंतर राजेंद्र यांनी पोलिसांत तक्रार केली.

दरम्यान,विनोद कांबळीने ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या माहितीनुसार, दुपारी तीन वाजता मॉलमध्ये त्याच्या पत्नीसोबत एक वृद्ध माणूस असभ्य वर्तन करत होता. तो वृद्ध व्यक्ती वारंवार अँड्रियाला स्पर्श करत होता. सुरुवातीला अनावधानाने हा प्रकार घडला असावा असे अँड्रियाला वाटत होते. मात्र, काही वेळाने हा प्रकार जाणूनबुजून सुरु असल्याचे तिच्या लक्षात आले. यानंतर अँड्रियाने त्या वृद्ध व्यक्तीला धक्का दिला आणि आम्ही तिथून निघून गेलो, असे विनोद कांबळीने सांगितले. काही वेळाने मॉलच्या फूड कोर्टमध्ये त्या वृद्ध व्यक्तीच्या दोन मुलांनी आम्हाला गाठले. त्यांनी माझ्या पत्नीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना रोखले असता त्यांनी मला देखील धमकावले, असे कांबळीने नमूद केले.

संतापजनक : पिककर्ज मंजुरीसाठी शेतकऱ्याचा पत्नीकडे शरीरसुखाची मागणी

महिला कॉन्स्टेबलच्या मुलीचा पोलिस उपायुक्तांवर बलात्काराचा आरोप

शिक्षिकेने कान पिरगळला; कायमस्वरूपी निलंबन करण्याची पालकांची मागणी