भारत बंद : नोएडा पोलिसांचा प्रताप, संघाच्याच नेत्याला चुकून उचलून नेले

rakesh

टीम महाराष्ट्र देशा- काल झालेल्या भारत बंद आंदोलनादरम्यान जाळपोळ करणारा कार्यकर्ता समजून पोलिसांनी चुकून चक्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्याला उचलून नेल्याची घटना घडली आहे. राकेश सिन्हा असं या नेत्याचं नाव आहे. त्यामुळे पोलीस कोणत्याही प्रकारची चौकशी न करताच आंदोलकांना ताब्यात घेत होते की काय असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

नेमकं काय घडलं?
दलित संघटनांनी हिंदुस्थान बंद पुकारल्यामुळे सगळीकडे तणावाचं वातावरण होतं. त्यात दगडफेकीसारखे प्रकार झाल्यामुळे पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव कार्यकर्त्यांना पकडायला सुरुवात केली.राकेश सिन्हा यांना एका वृत्तवाहिनीच्या गेटवरूनच नोएडा पोलिसांनी पकडलं आणि गाडीत बसवलं. काही दूर गेल्यानंतर पोलिसांना जेव्हा त्यांची चूक लक्षात आली तेव्हा पोलिसांनी सिन्हा यांना परत वृत्तवाहिनीच्या कार्यालयाशी आणून सोडलं.

राकेश यांनी स्वतः ट्वीट करून या घटनेची माहिती दिली आहे.