Breaking : कर्नल पुरोहित यांचा फैसला 16 जुलैला!

PUROHIT GETS BAIL

मुंबई : कर्नल प्रसाद पुरोहित यांनी मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून आरोपमुक्त करण्यासाठी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेचा निर्णय आता 16 जुलैला येणार आहे. या याचिकेवर आज अंतिम निर्णय येण्याची शक्यता होती, पण मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय 16 जुलैपर्यंत राखून ठेवला आहे.

एनआयएने नव्याने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये सर्वच आरोपींवरचा मोक्का काढला होता. त्यामुळे कर्नल पुरोहित यांच्या सुटकेचा मात्र मोकळा झाला होता. नुकताच त्यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर करत मोठा दिलासा दिला. त्यानंतर आता कर्नल प्रसाद पुरोहित यांनी आपल्यावर आरोप ठेवण्यापूर्वी लष्कराची परवानगी घेण्यात आली नसल्यानं, आपल्याविरोधात खटलाच दाखल करता येत नाही, असं म्हणत आरोपमुक्त करण्यात यावं अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात केली आहे.

2008 साली मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला होता तर 80 जण जखमी झाले होते. 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावत एका बाईकमध्ये बॉम्ब लावून स्फोट घडवण्यात आला होता. यानंतर साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना अटक करण्यात आली होती.