अश्लीलता आणि सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असते : हायकोर्ट

टीम महाराष्ट्र देशा : ‘गृहलक्ष्मी’ या मल्ल्याळम मॅगझिनच्या कव्हर पेजवर स्तनपान करणाऱ्या मॉडेलच्या फोटोला आक्षेप घेणाऱ्या याचिका कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. ‘सौंदर्य आणि अश्लीलता ही पाहणाऱ्याच्या नजरेत असते’ असं सांगत याचिकाकर्त्याला केरळ हायकोर्टाने फटकारले आहे. माजी सरन्यायाधीश जस्टिस अँटनी डॉमिनिक, दामा शेषाद्री नायडू यांच्या खंडपीठाने फेलिक्स एमए यांची याचिका फेटाळून लावली.

Loading...

नेमकं काय म्हटलं आहे हायकोर्टाने निर्णय देताना ?

‘एकासाठी जे आक्षेपार्ह आहे, ते दुसऱ्यासाठी कलात्मक असू शकतं. एखाद्या व्यक्तीला जे अश्लील वाटतं, त्यात दुसऱ्याला सौंदर्य दिसू शकतं. शेवटी सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असतं. मॅगझिनच्या कव्हर पेजवर असलेल्या स्तनपान करणाऱ्या मॉडेलच्या फोटोमध्ये काहीही बिभत्स किंवा आक्षेपार्ह नाही. राजा रवी वर्मांसारख्या कलाकारांच्या चित्रांकडे आम्ही ज्या नजरेने पाहतो, त्याच नजरेने आम्ही या फोटोकडे पाहिलं. जसं पाहणाऱ्याच्या नजरेत सौंदर्य असतं, तशीच अश्लीलताही असते.’

‘गृहलक्ष्मी’ या मल्याळम मासिकाच्या फेब्रुवारी महिन्याच्या कव्हर पेजवर मॉडेल नवजात बाळाला स्तनपान करताना गिलू जोसेफ झळकली आहे.हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. ‘स्तनपान करत असताना आम्हाला रोखून पाहू नका’.असं या मॅगझिनच्या कव्हर पेजवर लिहिलं आहे.

 Loading…


Loading…

Loading...