पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू!

टीम महाराष्ट्र देशा- जर भारताला पुन्हा एकदा पाकिस्तानला कठोर संदेश द्यायचा असेल तर भारत नक्कीच पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करु शकतो असा विश्वास निवृत्त लेफ्टनंट जनरल डी एस हुडा यांनी व्यक्त केला आहे. नियंत्रण रेषा पार करुन दहशतवादी तळांवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकचं नेतृत्व हुडा यांनीच केलं होतं. एएनआयशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्धस्त करण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक करण्याचा निर्णय हा सर्वस्वी राजकीय नेतृत्वाने घेतल्याचे जनरल डी.एस. हुडा यांनी म्हटले आहे. तसेच राजकीय नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाशी लष्कर पूर्णपणे सहमत होते, कारण आम्हाला त्यावेळी काही तरी विशेष करायचे होते. भविष्यामध्ये पाकिस्तान सुधारला नाही तर त्यांना धडा शिकवण्यासाठी भारतीय लष्कर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू शकते असे जनरल हुडा म्हणाले.

You might also like
Comments
Loading...