मनसेला खिंडार : महापौरांसह १२ नगरसेवकांचा मनसेला जय महाराष्ट्र

जळगांव : एका बाजूला मनसे अध्यक्ष राज ठाकरे व्यंगचित्र काढून सरकारवर कुंचल्याच्या माध्यमातून प्रहार करून आपला छंद जोपासण्यात दंग असताना जळगाव महापालिका निवडणुकांच्या आधीच राज ठाकरेंच्या मनसेला जळगावात खिंडार पडले आहे.जळगाव महापालिकेतील १२ नगरसेवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केलाय. त्यामुळे मनसेला मोठा धक्का बसलाय.

आमचे नेते सुरेश जैन हे आहेत असे सांगत महापौर ललित कोल्हे यांच्यासह मनसेचे १२ नगरसेवक खान्देश विकास आघाडीतर्फे मनपाची निवडणूक लढविणार आहेत. सुरेश जैन यांच्या नेतृत्वावर आम्हाला विश्वास असून पुढील निवडणूक लढविणार आहोत. मनसेचे १२ नगरसेवक सुरेश जैन गटात सहभागी झाले आहेत. मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान महापौर ललित कोल्हे यांनी ही माहिती दिली.

Loading...

सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक, तसेच वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठी १ ऑगस्ट २०१८ रोजी मतदान होणार आहे.आज मनसेचे ललित कोल्हे आणि त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी पालिका निवडणूक खान्देश विकास आघाडीतर्फे लढविणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मनसेला जळगावात जोरदार धक्का बसलाय.

सुरेश जैन यांच्या खांदेश विकास आघाडीने भाजपासोबत हातमिळवणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच भाजपासोबत न गेल्यास स्वबळ आजमावण्याचीही तयारी दर्शवली आहे. सुरेश जैन यांनी ही माहिती दिली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनेही आघाडी करून निवडणूक जिंकण्यासाठी सगळी ताकद पणाला लावली आहे. राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांनी ही माहिती दिली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
'माझे पप्पा' हा निबंध लिहून सर्वांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या 'त्या' मुलाची धनंजय मुंडेंनी घेतली दखल
‘सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षातील भूमिकेतून बाहेर यावं’
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने