Breaking: मराठा आरक्षणासाठी तरुणाची ग्रामपंचायत कार्यालयाला गळफास लावत आत्महत्या

बीड : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आणखीन एका तरुणाने आपले आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे, बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील सतीश भगवान होळकर यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला फाशी घेत आत्महत्या केली आहे.

राज्यभरात सध्या मराठा आरक्षण आंदोलन चांगलेच पेटल्याच दिसत आहे, अनेक ठिकाणी आंदोलकांकडून एसटी बस आणि गाड्यांच्या तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. 1 ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात जेलभरो आंदोलन देखील केले जात आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मराठा समाजातील आंदोलक आणि नेत्यांशी चर्चेच्या फैरी सुरू आहेत. मात्र, अद्याप कोणताही ठोस तोडगा निघू शकलेला नाही.

दरम्यान, मराठा युवक काकासाहेब शिंदे यांनी घेतलेल्या जलसमाधीनंतर सुरू झालेले आत्महत्यांचे स्तर थांबतात दिसत नाहीये. आता आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील सतीश भगवान होळकर या युवकाने ग्रामपंचायत कार्यालयाला फाशी घेत आत्महत्या केली आहे.