महिलांच्या अश्लील कपडे वापरण्यामुळे लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ : सपा नेत्याची मुक्ताफळे

नवी दिल्ली- महिलांच्या होणाऱ्या अत्याचारांना महिलांनाच दोषी असल्याचा अजब शोध एका सपा नेत्याने लावला आहे. महिलांच्या अश्लील कपडे वापरण्यामुळे लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा अजब शोध समाजवादी पार्टीचे महासचिव रामशंकर विद्यार्थी यांनी लावला आहे.

नेमकं काय म्हणणं आहे रामशंकर विद्यार्थी याचं ?

महिलांच्या अश्लील कपडे वापरण्यामुळे लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे अंगप्रदर्शन करणारे कपडे घालू नये.’देवाने स्त्री व पुरूषाच्या शरीराची ज्या प्रमाणे रचना केली आहे. त्याच प्रमाणे त्यांनी कपडे वापरायला हवे. अंगप्रदर्शन होणार नाही, असे कपडे त्यांनी वापरावे.

You might also like
Comments
Loading...