लो. टिळक नव्हे भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सवाचे जनक -पुणे महानगरपालिका

पुणे : पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कुणी केली? लोकमान्य टिळकांनी की भाऊ रंगारी यांनी? यावरुन यावर्षीही नव्याने वाद उभा राहण्याची शक्यता आहे. कारण, पुणे महापालिकेच्या वेबसाईटवर नव्याने माहिती अपडेट करण्यात आली आहे.

मागच्या काही वर्षांपासून पुण्यामध्ये गणेशोत्सवाची सुरुवात नेमकी कोणी केली ? लोकमान्य टिळक की, भाऊसाहेब रंगारी यावरुन वाद सुरु आहे. आता पुणे महानगरपालिकेने भाऊसाहेब रंगारी यांनी पुण्यात गणेशोत्सव सुरु केला असे म्हटले आहे.