‘मोदींच्या हत्येचा कट, ही केवळ अफवा’ : निरुपम

sanjay-nirupam

टीम महाराष्ट्र देशा- ज्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत घट होते आहे असे वाटते तेव्हा भाजपाकडूनच त्यांच्या हत्येच्या कटाची अफवा पेरली जाते असा आरोप काँग्रेसने केला आहे. भाजपाला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्यांच्यापुढे मोदींची घसरती लोकप्रियता वाढवण्यासाठी त्यांच्यापुढे काही पर्याय उरत नाही असे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी म्हटले आहे.

दरम्यान,माओवाद्यांकडून राजीव गांधी हत्याकांडासारखं घातक कृत्य करण्याचा प्रयत्न होता, असं सरकारी वकिल उज्ज्वला पवार यांनी पुणे सत्र न्यायालयात सांगितलं. त्यामुळे माओवाद्यांच्या निशाण्यावर नरेंद्र मोदीचं असल्याचा संशय व्यक्त होतोय.विल्सन यांच्या घरातून हस्तगत केलेल्या एका पत्रात राजीव गांधींवर झालेल्या हल्ल्याप्रमाणे हल्ला करण्याचा संदर्भ आहे. राजीव गांधी भारताचे माजी पंतप्रधान असल्याचा संदर्भ लक्षात घेता व सध्याचे वातावरण बघता हा हल्ल्याचा कट नरेंद्र मोदींच्या विरोधात असू शकेल का असा संशय घ्यायला जागा आहे.

जानेवारीमधल्या कोरेगाव भीमाप्रकरणी पुणे पोलिसांनी नक्षलवादी असल्याचा संशय घेत पाच जणांना अटक केली होती. या संदर्भात चौकशी केली असता सरकारी वकिल उज्ज्वला पवार यांनी विशेष न्यायालयात सांगितले की अटक केलेल्यांकडे जे साहित्य सापडले त्यावरून बंदी असलेली कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) राजकीय हत्येचा कट रचत होती.

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना नुकत्याच बेड्या ठोकल्या आहेत. तपासादरम्यान पोलिसांना याबाबत एक पत्र मिळालं असल्याचा दावाही सरकारी वकिलांनी न्यायालयात केला. चार लाख राऊंड फायर करण्याची क्षमता असलेलं एम 4 हे शस्त्र खरेदी करण्याचा प्लान असल्याचा धक्कादायक उल्लेख या पत्रात आहे. यासाठी आठ कोटी रुपये देण्याची तयारीही दर्शवल्याची माहिती आहेया शस्त्रांच्या आधारे एका मोठ्या नेत्याच्या हत्येचा कट आखला जात होता. असं सरकारी वकिल उज्ज्वला पवार यांनी न्यायालयात सांगितल्याने, माओवाद्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्या गेल्याचा संशय आहे.