‘या’ राज्याने केले थेट गाईला ‘राष्ट्रमाता’ घोषित

टीम महाराष्ट्र देशा- उत्तराखंडमध्ये गाईला राष्ट्रमाता घोषित करण्यात आले आहे. असे करणारे देशातील ते पहिलेच राज्य ठरले आहे. विधानसभेत याचे विधेयक मंजूर करण्यात आले असून याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे.

देशामध्ये गोरक्षणावरून कायदा हातात घेण्याच्या प्रकारामध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानेही खडे बोल सुनावले होते. मात्र उत्तराखंडने एक पाऊल पुढे टाकत थेट गाईला राष्ट्रमाता घोषित केले आहे.