ब्रेकिंग : उदयनराजे भोसले तातडीने देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे नेते आणि सातारचे खा. उदयनराजे भोसले यांनी तातडीने मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे उदयनराजेंच्या पक्षांतरांच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर पकडला आहे. उदयनराजे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरु आहे. तर उदयनराजे यांनी भाजप प्रवेशाचे संकेतही दिले होते. त्यामुळे उदयनराजे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बरोबर होणारी भेट ही पक्षांतर बाबत आहे का ? असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी सोडचिठ्ठी देत सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या जाणाऱ्या नेत्यांमध्ये काही शरद पवारांच्या विश्वासू नेत्यांचा देखील समावेश आहे. तसेच सातारचे खा.उदयनराजे भोसले देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. उदयनराजे भोसले देखील पवारांच्या विश्वासू नेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे पक्षांतराबाबत चर्चा होत असली तरी उदयनराजे यांनी याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

दरम्यान भाजपमध्ये जायचं की राष्ट्रवादीत राहायचं, यासाठी उदयनराजेंनी पुण्यात एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली होती. या बैठकीनंतर उदयनराजे पक्षांतराचा निर्णय बदलणार असल्याचं दिसत होते. तसेच कार्यकर्ते देखील आहे तिथेच स्थिर राहण्याचा सल्ला उदयनराजेंना दिला होता. भाजपमध्ये जाणं धोक्याचं ठरू शकतं,’ असंही कार्यकर्त्यांनी उदयनराजेंना सांगितले होते.