पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी, दिल्ली पोलिसांची धावाधाव

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे वृत्ताने खळबळ उडाली आहे. मोदींना जीवे मारणार असल्याचा ई-मेल दिल्ली पोलिसांना मिळाला आहे. त्यानंतर, दिल्लीतील पोलीस यंत्रणा, गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

प्राथमिक अंदाजानुसार हा मेल पूर्वेकडील राज्यातून आल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या स्तरावर चौकशी सुरु असून पूर्ण चौकशी झाल्यानंतरच यामागे कोणाचा हात आहे ते समोर येईल. याआधीही काही महिन्यांपूर्वी माअोवाद्यांकडून मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...