मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात कहर माजवला होता. आता कोरोनाची दुसरी लाट ही ओसरली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने ठाकरे सरकारने बऱ्यापैकी निर्बंध कायम ठेवले होते. तर, मंदिरे खुली करण्यासाठी भाजपने तीव्र आंदोलने केली होती. भाजपच्या दिग्गज नेत्यांनी देखील आंदोलनांमध्ये सहभाग घेत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला होता.
आता गणेशोत्सव काळानंतर देखील कोरोना स्थिती आटोक्यात असताना सरकारने दोन महत्वाचे निर्णय घेतले आहेत. येत्या ४ ऑक्टोबर पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घेतला. तर, काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंदिरे खुली करण्यास देखील परवानगी दिल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 24, 2021
‘नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. नवरात्रीच्या पाहिल्याच दिवशी प्रार्थना स्थळे खुली होणार असल्याने भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शक्ती कायद्याने मंत्रिमंडळातील बलात्काऱ्यांना त्रास होईल याची ठाकरे सरकारला भीती’
- ‘ज्या माणसाने एका डॉक्टर महिलेला खोट्या केस मध्ये ५२ दिवस तुरुंगात ठेवलं, त्याने…’
- फलटण-सातारा-बेळगाव-बंगळुरू मार्गे महत्वाचा पुणे ते बंगळुरू हा नवा हरित महामार्ग – गडकरी
- सोमय्यांनी कोल्हापुरात यावं, पण कुठल्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य करु नये; मुश्रीफांची सोमय्यांना तंबी
- सोमय्यांबाबत पहिल्या दिवशी जे घडलं ते चुकीचं; खुद्द अजित पवार यांनी दिली कबुली