श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या गाडीवर दगडांचा मारा, गाडीखाली चिरडून एका दंगेखोराचा मृत्यू

टीम महाराष्ट्र देशा- देशाचं संरक्षण करण्याची जबादारी असणाऱ्या सीआरपीएफ जवानांच्या गाडीवर भ्याड हल्ला करणाऱ्या दंगेखोरांपैकी एकाचा आज मृत्यू झाला आहे. श्रीनगरमध्ये काल शुक्रवारी केंद्रीय राखीव दलाच्या गाडीखाली आलेला २१ वर्षांय दंगेखोर आज मरण पावला आहे. कैसर अहमद असे या तरूणाचे नाव असून त्याच्यावर शेर ए कश्मिर इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्समध्ये उपचार सुरू होते.

सुमारे २०० जणांच्या संख्येनं आंदोलक राज्य सरकारविरोधात व केंद्र सरकारविरोधात आंदोलन करत होते. रमजानच्या महिन्यामध्ये सरकारने शांतता रहावी असे आवाहन करताना सरकारी सुरक्षा यंत्रणा शस्त्र चालवणार नाहीत असे सांगण्यात आले होते.शुक्रवारच्या नमाजाच्यावेळी श्रीनगरमधल्या काही भागांमध्ये तणावाचे वातावरण होते, हा तणाव निवळावा यासाठी शांतता राखण्याचे काम सुरक्षा यंत्रणा करत होत्या. परंतु दंगेखोर आणि फुटीरतावाद्यांनी जवानांच्या गाडीवर दगडफेक सुरु केली आणि जोरदार हल्ला केला.

सीआरपीएफच्या जवानांच्या गाडीला हजारोंच्या घोळक्याने घेरून त्यांच्यावर तुफानी दगडफेक केली. या दगडफेकीतून वाचण्यासाठी जवानांनी वेगाने गाडी पळवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नामध्ये दगडफेक करणारे तीन जण गाडीखाली चिरडले गेले. यातील एका तरुणाचा मृत्यू झाल्याने कश्मीर खोऱ्यात तणावाचं वातावरण आहे.

या घटनेनंतर माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला या दंगेखोराच्या मृत्यूचा पुळका आला असून राज्य सरकारला जबाबदार धरले आहे. शस्त्रसंधी याचा अर्थ बंदुकांचा वापर करायचा नाही त्याऐवजी जीपखाली चिरडायचं असा शेरा त्यांनी ट्विटरवर मारला आहे. याआधी त्यांनी तरूणांना जीपला बांधून त्यांची गावातून धिंड काढली. आता ते आंदोलकांवरून जीप नेतात असं ओमरनी म्हटलं आहे.

You might also like
Comments
Loading...