शेतकरी असल्याचं भांडवल करून नव्हे तर कर्तृत्वावर पवारसाहेब मुख्यमंत्री झाले – सुळे

टीम महाराष्ट्र देशा – एक चहा विकणारा माणूस या देशाचा पंतप्रधान झाला याचा मलाही अभिमान वाटला. शरद पवार  साहेबही शेतकरी कुटुंबातून राजकारणात आले पण त्यांनी त्याचं कधी भांडवल केलं नाही. आपल्या कर्तृत्वावर ते मुख्यमंत्री झाले, केंद्रीय मंत्री झाले या शब्दात खासदार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे . राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र हल्लाबोल यात्रेस गुरुवारी प्रारंभ झाल्यानंतर आज निफाडमध्ये हे आंदोलन करण्यात आलं. आपल्या भाषणात सुळे यांनी भाजप-शिवसेना सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

सुप्रिया सुळे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे-

काहीच काम न करणारे भाजप-शिवसेनेचे हे सरकार अवदसा आहे. नाशिकच्या या भागाला निधी मिळत नाही, त्यामुळे या इथला विकास खुंटला आहे. २०१९ ला काहीही झाले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्या पक्षाशी आघाडी करेल, ते सत्तेवर येणार असा विश्वास वाटतो

हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने गावोगावच्या लोकांना भेटता येत आहे. त्यांच्या प्रेमाचा ओलावा जाणवतोय. लोकांना आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून अपेक्षा आहेत. लाल दिव्यातली, हेलिकॉप्टरची सत्ता मला नको पण सामान्य माणसाच्या मनातली ही सत्ता, तिथलं मंत्रालय मला हवंय या शब्दात नाशिकमधील जनतेच्याप्रती खासदार सुप्रिया सुळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

मराठी भाषेचा मला सार्थ अभिमान आहे. मराठी भाषेची एकही शाळा या सरकारने बंद केली तर या सरकारला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष घराच्या बाहेरही पडू देणार नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जर आज जिवंत असते तर त्यांनी एकही मराठी शाळा बंद करू दिली नसती

कृषी संस्कृतीत मोलाचे स्थान असणाऱ्या बैलगाडीत स्वार होऊन हे शेतकरी विरोधी सरकार पायउतार करण्याचा निर्धार केला असल्याच त्यांनी ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केलं.