एसटी कर्मचाऱ्यांचा अघोषित बंद, कामगारांची धरपकड सुरू

मुंबई : राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पगारवाढीची घोषणा केली मात्र, ती फसवी असल्याने पुन्हा एकदा राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला असून, ते गुरुवारी मध्यरात्रीपासून अघोषित संपावर गेले आहेत. दरम्यान, एसटीचा संप मोडून काढण्यासाठी पोलिसांनी संपकरी कर्मचाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे. दरम्यान, संप मोडून काढण्यासाठी सरकारनं संपकरी कामगारांची धरपकड सुरू केली आहे.

मुंबईत परळ आगारातून पोलीस बंदोबस्तात तीन एसटी सोडण्यात आल्या असून एसटी सोडण्यास विरोध करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उस्मानाबादमध्येही १४ संपकरी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ठाणे आगारातील संप करणाऱ्या ४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.