‘डेटा चोर काँग्रेस’… डेटा लीक प्रकरणावरून कॉंग्रेस भाजपमध्ये जुंपली

#DataChorCongress

मुंबई : कॅम्ब्रिज अॅनॅलिटिका आणि काँग्रेस पक्ष यांच्यात काय संबंध आहे, हे स्पष्ट करावे, असे म्हणत केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी, किती भारतीयांची माहिती काँग्रेसने केम्ब्रिज अॅनॅलिटिकासारख्या परदेशी कंपनीला दिली आहे  ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे फेसबुकच्या डेटा लीक प्रकरणावरून भारतात आता राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहे.

Loading...

ज्या सोशल मीडिया मॅनेजमेंट कंपनीने फेसबुकचा डेटा लीक केल्याचा आरोप केला जात आहे, त्या कंपनीला 2019 सालासाठी काँग्रेसने कॅम्पेनिंगसाठी निवडल्याचा आरोप केला जात आहे.

ट्विटरवर #DataChorCongress हॅशटॅग वापरुन काँग्रेसला ट्रोल केले जात आहेत .ट्विटरवर #DataChorCongress हॅशटॅग वापरुन काँग्रेसवर जोरदार टीका केली जात आहे.

ट्रोल्सकडून काँग्रेसने भारतीयांची माहिती परदेशी कंपनीला दिली असल्याचा आरोप करत, राहुल गांधींसह काँग्रेसवर निशाणा साधला जात आहे. विशेष म्हणजे, हा हॅशटॅग ऑल इंडिया ट्रेण्ड होत असल्याने त्याबद्दल सोशल मीडियावरील चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान,“केम्ब्रिज अॅनॅलिटिका-काँग्रेस संबंधाच्या बातम्या फेक असून, डेटा चोर काँग्रेस हॅशटॅघ म्हणजे 39 भारतीयांचा मृत्यू आणि अविश्वास ठरावावरुन लक्ष वळवण्यासाठी काढले जात हे.”, असे काँग्रेस नेते तहसीन पुनावाला यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले रविशंकर प्रसाद ?

“कॅम्ब्रिज अॅनॅलिटिका आणि काँग्रेस पक्ष यांच्यात काय संबंध आहे, हे स्पष्ट करावे.मिस्टर मार्क झुकरबर्ग, भारताच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्र्यांचं निरीक्षण काय असतं, हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे जर भारतीयांची माहिती चोरली गेली, तर ते सहन केले जाणार नाही. आमच्याकडे तंत्रज्ञानविषयक कायदे कठोर आहेत.”

केम्ब्रिज अॅनॅलिटिका काय आहे?

केम्ब्रिज अॅनॅलिटिका ही सोशल मीडिया मॅनेजमेंट आणि डिजिटल सपोर्ट या क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. गेल्या 25 वर्षांपासून ही कंपनी कार्यरत असून, जगातील अनेक देशांमध्ये सुमारे 100 हून अधिक कॅम्पेन्स या कंपनीने केले आहेत. राजकीय निवडणुकांमध्ये एखाद्या विशिष्ट पक्षासाठी काम करत, त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे व त्यांच्या मतामध्ये परिवर्तन करण्याचे काम कॅम्ब्रिज अॅनॅलिटिका करते.

https://twitter.com/siddarthpaim/status/976425295203872768

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बांगड्यांच्या वादात अमृता फडणवीसांची उडी, आदित्य ठाकरेंवर केला पलटवार
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू