जनतेच्या आशीर्वादाने मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार- सिद्धरामय्या

टीम महाराष्ट्र देशा – विरोधक एकत्र आल्यामुळे आपण मुख्यमंत्री होऊ शकलो नाही मात्र जनतेच्या आशीर्वादाने मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार, असे वक्यव्य करून कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी खळबळ उडवून दिली आहे. सिद्धरामय्या यांच्या या वक्तव्यामुळे कर्नाटक मधील राजकारण पुन्हा अस्थिर होतंय की काय अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

विरोधक एकत्र आल्यामुळे आपण मुख्यमंत्री होऊ शकलो नाही मात्र जनतेच्या आशीर्वादाने मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणारसध्या राजकारणात जात आणि पैसाच बोलतो. मला वाटत होते की जनता मला पुन्हा मुख्यमंत्री करेल. पण दुर्दैवाने तसे झाले नाही. अर्थात हा काही शेवट नाही. राजकारणात जय-पराजय होतच असतो, असे सिद्धरामय्या यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.