fbpx

शरद पवार आजपर्यंत का पंतप्रधान झाले नाहीत…काही कळत नाही- नाना पाटेकर

nana patekar sharad pawar

पुणे- देवेगौडा वगैरे पंतप्रधान झाले. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पंतप्रधान झाले पाहिजे. खरेतर ते फार पूर्वीच पंतप्रधान व्हायला हवे होते अशी अपेक्षा जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केली आहे. शरद पवार पंतप्रधान व्हायला हवेत. त्यांचा राजकीय अनुभव प्रचंड मोठा आहे. त्यांनी केंद्रात अनेक मंत्रीपदेही भुषविली आहेत. ते पंतप्रधान होता होता राहिले पण का झाले नाहीत ते कळत नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय येथील नाम फाऊंडेशनच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नाना बोलत होते. यावेळी अभिनेते मकरंद अनासपुरे उपस्थित होते. नाम फाउंडेशन’तर्फे आंतरधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत नाना बोलत होते.

नेमकं काय म्हणाले नाना पाटेकर ?

देवेगौडा वगैरे पंतप्रधान झाले. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पंतप्रधान झाले पाहिजे. खरेतर ते फार पूर्वीच पंतप्रधान व्हायला हवे होते.त्यांचा राजकीय अनुभव प्रचंड मोठा आहे. त्यांनी केंद्रात अनेक मंत्रीपदेही भुषविली आहेत. ते पंतप्रधान होता होता राहिले पण का झाले नाहीत ते कळत नाही? अनेक कलाकार राजकीय पक्ष स्थापन करतात आपणही करणार का? या प्रश्नावर पाटेकर यांनी, “पक्ष वगैरे नको रे बाबा’ असे म्हणत याविषयी चर्चा सुरू होण्याआधीच त्याला पूर्णविराम दिला. पक्ष काढायचा म्हटलं, की माणसे लागणार आणि कोणत्याही माणसाची हमी देऊ शकत नाही. एखादा माणूस चुकीचा जरी वागला, तरी त्याचेच समर्थन करावे लागते. त्याला पक्षातून हाकलूनही देता येत नाही. मग पक्षाची उद्दिष्टे बाजूला राहतात. आम्हाला कुणी पक्षात या असे बोलावले नसेल, पण पक्ष वगैरे नको रे बाबा, अशा शब्दांत नाना पाटेकर यांनी भविष्यात पक्षात जाणार नसल्याचे स्पष्ट केले.