शिवरायांबद्दल अपशब्द काढणाऱ्या छिंदमला महाराष्ट्रातून हद्दपार करा : संभाजीराजे

chtrapati sambhaji

टीम महाराष्ट्र देशा- अहमदनगर महापिकेतील भाजपचे निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरून त्यांचा अपमान केल्यानंतर आता मोठ्याप्रमाणावर राजकीय प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या नगरचा उपमहापौर श्रीपाद छिंदमवर सरकारने शिवभक्तांच्या भावना लक्षात घेऊन त्वरित कडक कारवाई करावी व त्याला महाराष्ट्रातून हद्दपार करावे. महाराष्ट्रात अशा प्रकारचे वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही.अशा समाज कंटकास जेवढे शासन होईल तेवढे कमी आहे. अशा शब्दांत खासदार युवराज संभाजीराजे यांनी अहमदनगरच्या छिंदम प्रकरणावर फेसबुक पोस्टद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.

sambhaji raje

Loading...

दरम्यान श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरून अपमान केल्यानंतर सर्वत्र निदर्शने करण्यात येत आहेत.राष्ट्रवादी कॉंग्रेस,शिवप्रेमी संघटना तसेच शिवसेनेकडून राज्यात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली .पुण्यात मनसेकडून छिंदमच्या पुतळाल्या भर चौकात फाशी देण्यात आली. तसेच वंदे मातरम संघटनेकडून छिंदमच्या वक्ताव्याचा निषेध करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी श्रीपाद छिंदम याचा पुतळा जाळुन निषेध व्यक्त केला.

abvp,mns
काय आहे प्रकरण?

श्रीपाद छिंदम हे अहमदनगर महापालिकेचे उपमहापौर आहेत. छिंदम यांनी त्यांच्या प्रभागात काम करण्यासाठी पालिकेकडे कर्मचारी मागितले होते. संबंधित कर्मचाऱ्याने तुम्हाला तुमचे काम करून देतो, मी नाही म्हणालेलो नाही. पण शिवजयंती होऊ दिली तर बरं होईल, अशी विनंती केली. कर्मचाऱ्याच्या उत्तराने चिडलेल्या छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. कर्मचाऱ्यावर आपला रोख झाडताना त्यांची जीभ घसरली, दरम्यान ही ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. संबंधित कर्मचाऱ्याने यूनियनकडे तक्रार केल्यानंतर सर्व प्रकार समोर आला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
मराठा क्रांती मोर्चाचा पहिला बळी ' मी ' ठरलो : आमदार भारत भालके
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
रडत राऊतांमुळे यापुढे सामना बंद,बंद,बंद : मनसे
माझं कुणी काहीच ' वाकडं ' करू शकत नाही : संजय राऊत