fbpx

ना देशमुख ना मोहिते-पाटील,भाजपचा माढ्याचा उमेदवार ठरला?

टीम महाराष्ट्र देशा- फलटणचे युवा नेते व काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह ना. निंबाळकर भाजपमध्ये प्रवेश करणार असून, या घडामोडीने सातारा जिल्हा काँग्रेसला जबर हादरा बसला आहे. रणजितसिंह सोमवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुका जाहीर होताच काहींनी भाजप तर काहींनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षबदलामध्ये आता आणखी एका नावाची भर पडली आहे. दरम्यान,माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीही भाजपकडून रणजितिसंह नाईक निंबाळकरांना देण्यात येण्याची शक्यता आहे.

कोण आहेत रणजितिसंह नाईक निंबाळकर?

रणजितसिंह ना. निंबाळकर हे माजी खासदार हिंदुराव ना. निंबाळकर यांचे चिरंजीव आहेत. स्वराज उद्योग समुहाच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात युवा वर्ग आपल्याकडे आकर्षित केला आहे. 1996 साली रणजितसिंहांचे वडील हिंदूराव ना. निंबाळकर यांनी शिवसेना – भाजप युतीकडून लोकसभा निवडणूक लढवतसातारा लोकसभा मतदारसंघात आश्चर्यकारकरित्या विजय मिळवला होता.