fbpx

‘काँग्रेसने मला छळले म्हणून मी तुला छळतोय’

मुंबई – आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून भाजपवर टीकास्त्र सोडणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसने मोदींना छळले म्हणून मोदी जनतेला छळत असल्याची टीका राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून केली आहे.आता भाजपकडून या टीकेला कश्या पद्धतीने उत्तर दिलं जातंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

काय आहे व्यंगचित्र?
राज ठाकरेंनी व्यंगचित्रात नरेंद्र मोदी यांना दाखविले असून त्यांच्या हातात भारतीय जनतेला दाखविले आहे. मोदी जनतेला म्हणत आहे, काँग्रेसने मला छळले म्हणून मी तुला छळत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी एका सभेत मला काँग्रेसने छळले होते, असे म्हंटले होते. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी हे व्यंगचित्र रेखाटले आहे.