कॉंग्रेसमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, कॉंग्रेसची पराभवाची मालिका सुरूच

टीम महाराष्ट्र देशा- काही महिन्यांपूर्वी ईशान्य भारतातील त्रिपुरा आणि नागालँड या दोन राज्यांमध्ये ‘कमळ’ फुललं, तेव्हा देशातील २० राज्यांमध्ये भाजपा सत्तेत होती. त्यानंतर, मेघालयमध्येही नॅशनल पीपल्स पार्टीसोबत त्यांनी सत्ता स्थापन केली आणि २१चा आकडा गाठला होता. आता कर्नाटकमध्ये त्यांची घोडदौड वेगानं सुरू आहे आणि ते सत्तेच्या जवळ जाताना दिसताहेत. तसं झाल्यास, एकेकाळी देशभरात सत्ता करणारा काँग्रेस फक्त तीन राज्यांमध्ये शिल्लक राहणार आहे.

या विजयामुळे दक्षिणेमध्ये पुन्हा पाय रोवण्याची संधी भाजपला मिळाली आहे. 2019 लोकसभा निवडणुकीची ‘सेमी फायनल’ जिंकल्यामुळे भाजपचे मनोधैर्य उंचावले आहे. देशातील 29 पैकी 22 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे.

भाजपकडील २२ राज्यं

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, झारखंड, आसाम, हरियाणा, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, नागालँड, त्रिपुरा, मेघालय, कर्नाटक.

काँग्रेसची सत्ता असलेली तीन राज्यं

bagdure

पंजाब, मिझोरम, पाँडेचरी

प्रादेशिक पक्ष सत्तेत असलेली राज्ये 

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, ओडिशा, तेलंगण, केरळ, दिल्ली.

दरम्यान,

कर्नाटक निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत असून, आतापर्यंत हाती आलेल्या निकालावरून भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. तर कॉंग्रेसची मात्र पीछेहाट झाली आहे. दरम्यान कर्नाटकात लिंगायत मतदारांचा प्रभाव असलेल्या मतदारसंघात भाजपा सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. लिंगायत मतदारांचा प्रभाव असलेल्या २९ जागांवर भाजपा आघाडीवर आहे. काँग्रेस त्या तुलनेत बरीच पिछाडीवर पडली आहे. लिंगायत मते निर्णयाक असलेल्या मतदारसंघात काँग्रेस ९ आणि जनता दल सेक्युलर सहा जागांवर आघाडीवर आहे.

दरम्यान कर्नाटक निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्मची मान्यता देण्यात यावी अशी शिफारस केंद्र सरकारकडे केली होती यावरून प्रचंड राजकारण करण्यात आले होते मात्र या मुद्यावरही लिंगायत समाजाचे मत आपल्याकडे ओळवण्यात कॉंग्रेसला अपयश आले. काँग्रेसने ४९ लिंगायत आणि ४६ वोक्कालिगाना उमेदवारी दिली आहे तर भाजपाचे ६८ लिंगायत आणि ३८ वोक्कालिगाना संधी दिली आहे. जेडीएसने ४१ लिंगायत आणि ५५ वोक्कालिगाना उमेदवारी दिली आहे.

You might also like
Comments
Loading...