संतापजनक : भगतसिंग यांना ‘शहीद’ दर्जा देण्यास पंजाबचा सरकारचा नकार

जरा याद करो कुर्बानी

टीम महाराष्ट्र देशा- आपल्या बलिदानाने आणि कर्तुत्वाने जगभरातील युवकांच्या हृदयात अढळस्थान प्राप्त केलेल्या शहीद-ए-आजम भगतसिंग यांच्या विषयी सर्वांनाच मोठा आदर आहे. मात्र पंजाब सरकार भगत सिंग यांना शहीद मानायला तयार नसल्याचं समोर आलं आहे. भगतसिंग यांचा शहीद दर्जा देण्याच्या औपचारीक मागणीवर पंजाब सरकारने हात वर केले आहेत.

bagdure

आपले अंग झटकताना पंजाब सरकारने सविंधान अनुच्छेद १८ प्रमाणे एबॉलिशन ऑफ टाइटल्स नियमांचा दाखला दिला आहे. सरकार सैनिकांव्यतिरिक्त इतर कोणाला टायटल देऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. पंजाब सरकारच्या या संतापजनक वागण्यामुळे भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू आपल्या मायदेशातच उपेक्षित असल्याची भावना तरुण व्यक्त करू लागले आहेत.

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वरिल हरिचंद अरोराने पंजाब सरकारला यासंदर्भात पत्र लिहले. यातून त्यांनी भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना ‘शहीद’ दर्जा देण्याची मागणी केली होती. या पत्राच्या उत्तरात सरकारने इंडियन काऊंसिल ऑफ हिस्टॉरीकल रिसर्चने प्रकाशित केलेल्या ‘डिक्शनरी ऑफ मार्टियर्स : इंडियाज फ्रीडम स्ट्रगल’ चा दाखला देत भारताच्या शहीदांच वर्णन केलयं.

 

You might also like
Comments
Loading...