‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे अध्यक्ष रवींद्र मराठे यांना उद्या जामीन मिळण्याची शक्यता

पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याच्या आरोपावरुन अटक झालेले बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्या जामीन अर्जावर पुणे न्यायालय मंगळवारी निर्णय देणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष आणि सीईओ रवींद्र मराठे यांची चौकशी पूर्ण झाली असून आवश्यक ती कागदपत्र ताब्यात घेण्यात आली आहेत. त्यामुळे मराठे यांना जामीन देण्यात यावा, असं मराठे यांच्या  वकिलांनी पुणे सत्र न्यायालयात सांगितलं.

Loading...

सोमवारी विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांच्या न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी झाली. सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला असून न्यायालय जामीन अर्जावर उद्या निर्णय देणार आहे. मराठे यांना जामीन देण्यास आमची काहीही हरकत नसल्याचं पोलिसांकडून न्यायालयात सांगण्यात आलं. तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश मोरे यांनी न्यायालयाला रविंद्र मराठे यांना जामीन देण्यास हरकत नसल्याचं लेखी दिलं आहे त्यामुळे मराठे यांना उद्या जामीन मिळण्याची शक्यता आहे.

आता बँक ऑफ महाराष्ट्रालाही गंडा…

बँकांनो,तर तुमच्या कर्जवसुलीस माझा असहकार : जिल्हाधिकारी

रिझर्व्ह बँक ऑफ लव्ह!…का होतेय ही लग्न पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल ?

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...