fbpx

इंडियन मायकल जॅक्सन प्रभूदेवाला कला क्षेत्रात ‘पद्मश्री’

टीम महाराष्ट्र देशा: आपल्या हटके डान्सिंग स्टाईलने सर्वांचीच मने जिंकणारा कोरियोग्राफर, चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता प्रभुदेवा याला आज कला क्षेत्रातील पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे . राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते प्रभुदेवा यांना हा पुरस्कार देण्यात आला. या बातमीने त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले  आहे .

http://https://twitter.com/rashtrapatibhvn/status/1105006648928751616

प्रभुदेवा हा उत्तम डान्सरचं नाही तर एक चांगला अभिनेता आणि दिग्दर्शकसुद्धा आहे. नृत्य हे त्याच्या नसानसात भिनलेले आहे. त्याचा डान्स पाहून चांगल्या चांगल्यांची बोलती बंद होते.त्याने तमिळ, तेलगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. २५ वर्षांच्या कार्यकाळात त्याने खूप सारे पुरस्कार आणि लोकप्रियता मिळवली आहे. चाहत्यांचे त्याच्यावरील असलेल्या प्रेमामुळेच त्याला हा सन्मान मिळाल्याचे त्याने ट्वीट केले आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते विविध क्षेत्रातील ५६ जणांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

3 Comments

Click here to post a comment