मुंबई : विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते तथा भाजप नेते प्रविण दरेकरांना सहकार विभागाने मोठा धक्का दिला आहे. आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार प्रविण दरेकर (Pravin Darekar) मजूर नसल्याचे कारण सहकार विभागाने देत त्यांचे संचादक पदासाठीचा दावा फेटाळला आहे. त्यामुळे हा प्रविण दरेकरांसह भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरेकरांच्या अंगावरुन विजयाचा गुलाल उतरण्याआधीच अपात्र ठरल्याने त्यांच्या समर्थकात नाराजी पसरली आहे.
शिवसेना (Shivsena), भाजप (Bjp) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) या तीन्ही पक्षांनी मिळून सहकार पॅनल स्थापन केले होते. २१ जागांपैकी १७ जागा बिनविरोध निवडूण आल्या. उर्वरित चार जागांवर शिवसेना बंडखोरांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. या चार जागांवरही सहकार पॅनलचा विजय झाला होता. त्यामुळे प्रविण दरेकर यांचे संचालक पद कायम रहाणार होते. मात्र सहकार विभागाने त्यांचा दावा फेटाळून लावल्याने आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरेकर मजूर संस्थेचे प्रतिनिधी म्हणून निवडून आले होते. त्यांनी मजूर प्रवर्गातूनच अर्ज भरला होता. मात्र विरोधकांनी त्यावर आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती. याअनुषंगाने दरेकर यांना सहकार विभागाने नोटीसही बजावली होती. ‘या नोटिशमध्ये ‘आपण मजूर आहात की नाही,’ असा खुलासा दरेकरांना करण्यात आला होता. आता चौकशीनंतर प्रवीण दरेकर मजूर नसल्याचे सांगत म्हणून त्यांचे सदस्यत्व अपात्र असल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे. मजुरीचे काम न करणाऱ्या सभासदांना संस्थेतून काढून टाकण्यात यावे,” असे आदेश उच्च न्यायालयाकडूनही देण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या
- विद्यापीठ, कॉलेज सुरु की बंद? उदय सामंतांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक
- पुणे जिल्हा बँकेची आज मतमोजणी; अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला
- अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती
- ‘..तरी चीनचे राष्ट्राध्यक्ष पंतप्रधानांबरोबर फाफडा, ढोकळा खाताना दिसतील’, संजय राऊतांचा टोला
- ‘…पण अखेर त्याने मला गाठलंच’, पॉझिटिव्ह आल्यानंतर रोहित पवार यांची भावनिक पोस्ट
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<