fbpx

प्रकाश आंबेडकरांचे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचे संकेत

प्रकाश आंबेडकर

पुणे : आगामी निवडणुकांमध्ये पुरोगामी पक्षांना एकत्र घेऊन, ‘वंचित बहुजन आघाडी’ बॅनरखाली लढणार आहोत. त्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत वाटाघाटी होऊ शकतात, अशी माहिती भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

जो पुरोगामी राजकीय पक्ष लोकसभेच्या निवडणुकीत धनगर, माळी, भटके विमुक्त, लहान ओबीसी व मुस्लिम समाजासाठी प्रत्येकी 2 जागा देणा-या पक्षासोबत आघाडी करण्यात येईल.पुरोगामी विचारांच्या पक्षांसाठी आमचे दरवाजे मोकळे आहेत असं देखील ते म्हणाले.दरम्यान,यापूर्वीही प्रकाश आंबेडकर यांनी रिडालोस अर्थात रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडीचा प्रयोग केला पण त्याला फारसं यश मिळालं नव्हतं.

आंबेडकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आगामी राजकीय वाटचालीबद्दल माहिती दिली. पुरोगामी विचारांच्या पक्षांना एकत्र येण्याची साद जरी आंबेडकर यांनी दिली असली तरी पुरोगामी म्हणजे नेमके कोणते पक्ष हे मात्र आंबेडकर यांनी सांगितले नाही तसेच शिवसेनेने स्वबळावर आगामी निवडणुका लढविण्याच जाहीर केलं असल्याने आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही असं देखील ते म्हणाले.

जम्मू-काश्मीर प्रमाणेच महाराष्ट्र सरकार अल्पमतात येण्याची शक्यता

यंदाचे पावसाळी अधिवेशन मुंबईला घेण्यासाठी भाजपचा आग्रह आहे. तर हे पावसाळी अधिवेशन मुंबईत घ्यावे, अशी शिवसेनेची इच्छा आहे. जर हे अधिवेशन नागपुरला झाले आणि शिवसेना या अधिवेशनाला नाही गेली तर सरकार अल्पमतात येण्याची शक्यता असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

आम्ही कधीच म्हटलं नाही भिडेंनी स्वत: दगडफेक केली, पण!- प्रकाश आंबेडकर