देव तारी त्याला कोण मारी? बस 20 फूट खोल ओढ्यात पडूनही सर्व प्रवासी सुखरूप

पुणे : कात्रजहून निगडीकडे जाण्याऱ्या पीएमपीएल बसला वारजे पूलावर अपघात झाला .चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस वारजे पूलावरुन खाली कोसळली. या अपघातामध्ये 10 ते 15 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 20 फूट खोल ओढ्यात पडूनही सर्व प्रवासी सुखरूप आहेत त्यामुळे देव तारी त्याला कोण मारी या म्हणीची प्रचीती आज या अपघातानंतर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रजहून वाकड-निगडीकडे जाणारी बस ११ वाजण्याच्या सुमारास वारजे माळवाडीच्या उड्डाणपुलाजवळ आली. वारजे पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कात्रजहुन निगडीला जाणारी पीएमपीएमएल बस वारजे पुलाजवळ बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस 20 फूट खोल ओढ्यात पडली.या अपघातात 10 प्रवासी जखमी झाले असून त्यांना स्थानिकाच्या मदतीनं बाहेर काढण्यात आले आहे. ओढ्यालगत उड्डाण पुलाचे काम सुरू आहे त्या ठिकाणी राहण्याची सोय करण्यात आलेल्या पञ्याच्या शेडवर ही बस कोसळली

बसमधील काही प्रवासी तसेच शेडमधील दोन नागरिकांना उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. पोलीसदेखील घटनास्थळी उपस्थित झाले आहेत. वाहतूक पुन्हा पुर्ववत करण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरु आहे.

TYGR- ओला, उबरला टायगरचे आव्हान

स्वारगेट स्थानकावर शुकशुकाट, रेल्वे सेवा सुरळीत