‘हिटलर आणि इंदिरा गांधी यांनी लोकशाहीला हुकूमशाहीत बदलण्यासाठी संविधानाचा वापर केला’

टीम महाराष्ट्र देशा- आणीबाणीचा निषेध करताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसवर आणि इंदिरा गांधी यांच्यावर कडाडून टीका केली आहे. जेटली यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची थेट हुकूमशहा हिटलरशी तुलना केली आहे. त्यामुळे काँग्रेसआणि जेटली यांच्यात जुंपण्याची चिन्हे दिसत आहेत.

आणीबाणीचा निषेध म्हणून भाजप आज काळा दिवस पाळत आहे.आजच्याच दिवशी १९७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. ट्विट करून जेटली यांनी थेट इंदिरा गांधी यांची हिटलरशी तुलना केली आहे.

नेमकं काय म्हटलं आहे अरुण जेटली यांनी ट्विटमध्ये ?

‘इंदिरा गांधी यांनी मुलभूत अधिकारांची पायमल्ली करत आणीबाणी लागू केली होती. हिटलर आणि इंदिरा गांधी यांनी लोकशाहीला हुकूमशाहीत बदलण्यासाठी संविधानाचा वापर केला होता. हिटलरने विरोधी पक्षांच्या नेत्यांना मोठ्या प्रमाणावर तुरुंगात डांबले होते. त्यानंतरच त्याने त्याचे अल्पमतातील सरकार बहुमतापर्यंत नेलं होतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी घातल्यानंतर खोडसाळ प्रचारांना मुभा दिल्यास त्याचे सर्वात आधी बळी तुम्हीच ठरता हे आणीबाणीने दाखवून दिले आहे. कारण आणीबाणी लागू करणाऱ्यांना त्यांचाच अपप्रचार खरा असल्याचा भास होऊ लागतो. आणीबाणीच्या काळात देशात भीतीचं वातावरण होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विरोधी पक्ष नेते आणीबाणीचा विरोध करत होते. सातत्याने सत्याग्रह होत होते.

काँग्रेसवर टीका करताना मोदींनी फारच खालचा स्तर गाठला – शत्रुघ्न सिन्हा

सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून पैशाचा वापर