निरंजन डावखरेंनी ठोकला राष्ट्रवादीला रामराम, उद्या करणार भाजपमध्ये प्रवेश

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसला ठाण्यात मोठा धक्का बसला आहे. कारण राष्ट्रवादीचे दिवंगत नेते वसंत डावखरे यांचे सुपुत्रआमदार निरंजन डावखरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित निरंजन डावखरे गुरुवारी (उद्या) भाजपत प्रवेश करणार आहेत.निरंजन डावखरे यांनी पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामाही दिला आहे.निरंजन डावखरे हे आहेत.

निरंजन डावखरे गुरुवार उद्या  भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी अकरा वाजता भाजपा प्रदेश कार्यालयात निरंजन डावखरे भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.राष्ट्रवादी काॅग्रेसचे ठाण्यातील दुसरे नेते जितेंद्र आव्हाड आणि माजी खासदार परांजपे यांची ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काॅंग्रेसवर पकड आहे. या दोघांनी डावखरे यांची पक्षात कोंडी केल्याचा त्यांच्या समर्थकांचा आरोप आहे.

Loading...

निवडणुका जवळ येऊ लागताच पक्षांताराला वेग येतो तर काही नेते आगोदरच पक्षबदल करून निवडणुकीची तयारी करतात. सध्या राज्यात हळूहळू निवडणुकांचे वारे वाहू लागले असून नेतेमंडळी सर्व शक्यतांचा विचार करून पक्ष बदल करू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण आमदार निरंजन डावखरे हे भाजपात प्रवेश करणार आहेत.निरंजन डावखरे यांची पक्षातील जितेंद्र आव्हाड, परांजपे या स्थानिक नेत्यांकडून कोंडी केली जात असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

निरंजन डावखरे हे सध्या कोकण पदवीधर मतदार संघातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. आमदारकीची टर्म संपत आलेली असतानाच पक्षात कोंडी होऊ लागल्याने ते अस्वस्थ असल्याचे सांगितले जाते. त्यातूनच ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात आले. त्यांच्या पक्षांतरांचा मुहूर्त पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा ठरविण्यात आल्याने त्याचा फटका काँग्रेसला तर फायदा भाजपाला होणार आहे.