fbpx

ब्रेकिंग: बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंचा दणदणीत विजय, भाजपचा फुगा फुटला

पुणे : यंदा बारामती जिंकणारच म्हणून दंड थोपटनाऱ्या भाजपचा फुगा अखेर फुटला आहे, संपूर्ण राज्यात राष्ट्रवादीची पिछेहाट होत असताना सुप्रिया सुळे यांनी १५७०४२ मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. एका बाजूला राज्यात राष्ट्रवादीची धूळधाण उडाली असताना सुळे यांनी पक्ष आणि पवारांची प्रतिष्ठा राखली आहे.

लोकसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत, देशभरात एनडीएला बहुमत मिळताना दिसत आहे. केवळ भाजप ३३०  पेक्षा जास्त  मतदारसंघात आघाडीवर आहे. महाराष्ट्रत देखील भाजप – शिवसेना युतीला दणदणीत यश मिळताना दिसत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या ट्रेंडनुसार युती ४३ जागांवर तर आघाडी केवळ ४ जागांवर विजयी होताना दिसत आहे.

सुप्रिया सुळे यांना एकूण६४९४१५ मते तर भाजप उमेदवार कांचन कुल यांना ४९२३७३  मते मिळाली आहेत. सुळे यांचा १५७०४२ मतांनी विजय झाला आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपने मोठे आव्हान उभे केले होते, केंद्र आणि राज्यातल्या जवळपास डझनभर मंत्र्यांनी बारामतीमध्ये सभा घेतल्या होत्या, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे मतदारसंघात तळ ठोकून होते. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी आपला गड राखला आहे.