ब्रेकिंग न्यूज : ‘मरकज’मधील काही सहभागी यवतमाळमध्ये दाखल, प्रशासनाकडून चोख बंदोबस्त

यवतमाळ : निजामुद्दीन (दिल्ली) येथील सम्मेलनात यवतमाळ जिल्ह्यातील 12 जण सहभागी झाले होते. तशी यादी प्रशासनाला प्राप्त झाली आहे. यापैकी यवतमाळ जिल्ह्यात वास्तव्य असलेले 5 जण परत आले असून त्यांना विलागिकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित 7 जण अद्यपही जिल्ह्यात परत आले नाही. यापैकी काही जण परस्पर दुसऱ्या जिल्ह्यात / राज्यात गेल्याची किंवा दिल्लीतच थांबण्याची शक्यता आहे. तरीसुद्धा प्रशासनाकडून त्यांची माहिती घेण्याचे काम सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

दिल्लीहून आलेले १४ जण पिंपरी चिंचवडच्या रुग्णालयात दाखल, १८ जणांना शोधण्याचे काम सुरू

दिल्लीच्या निजामुद्दीन येथे झालेल्या मरकजमध्ये सहभागी झालेल्या पिंपरी चिंचवड येथील १४जणांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले  आहे.  दिल्ली येथे झालेल्या मरकजमध्ये  पुणे परिसरातील ९२ जण सहभागी झाल्याचे आढळून आले. त्यामुळे यापैकी ३५ जणांना नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.  तर आता यामध्ये  पिंपरी चिंचवड येथील १४ जणांची भर पडली आहे.

दिल्लीतील निजामुद्दीन इथे झालेला मरकज हा देशाची डोकेदुखी ठरला आहे. कारण एकाच ठिकाणी 2000 हजाराहून अनेकजण एकाच ठिकाणी एकत्र आल्याने कोरोनाचा संसर्ग झाल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. त्या मरकजमध्ये महाराष्ट्रातीलही काही नागरिक सहभागी झाले होते. त्यापैकी काही जण पिंपरी चिंचवड परिसरातील देखील होते. त्यामुळे आता महापालिकेने निर्णायक पाऊलं उचलत १४ जणांचा महापालिकेने शोध घेतला असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.