fbpx

मोठी बातमी : अबकी बार मोदी सरकार, सेन्सेक्स ४० हजार पार

टीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल आता हाती येऊ लागले आहेत. पहिल्या तीन तासांच्या ट्रेंडमध्ये भाजपसह एनडीएने विजयी आघाडी घेतली आहे. दिल्लीत पुन्हा एकदा मोदी सरकार येण्याचे संकेत मिळाल्याने सेन्सेक्सने ऐतिहासिक ४०  हजारांचा आकडा पार केला आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपचे संख्याबळ कमी होणार असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत होता, मात्र आतापर्यंत हाती आलेल्या ट्रेंडनुसार ५४५  पैकी ३३०  – ३३५  जागांवर एनडीएने आघाडी घेतली आहे. त्यामुळे दिल्लीच्या सत्तेत फिर एक बार मोदी सरकार निश्चित होताना दिसत आहे. शेअर बाजाराने देखील या निकालांचे स्वागत केले आहे