मुंबई : महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. गृहमंत्र्यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. अनिल देशमुख वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी राज्यातील विविध भागांच्या दौऱ्यावर होते. त्यांचा नुकताच आता विदर्भ दौरा झाला. या दौऱ्यादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोनाची चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे.
गृहमंत्र्यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या ट्विट मध्ये म्हंटल आहे की, ‘आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल’, असं अनिल देशमुख म्हणाले.
सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे वाद-विवाद होत आहेत. गृहखात्यावर वारंवार वेगवेगळ्या प्रकारामुळे ताण येत आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांना सातत्त्याने महाराष्ट्राचा दौरा करावा लागत आहे. त्यामुळेच त्यांचा संपर्क अनेक लोकांशी,पक्षातील कार्यकर्त्यांशी येत आहे. अशातच त्यांना आता कोरोनाची लागण झाल्यामुळे सगळ्यांच्याच चिंतेत भर पडलेली आहे.
आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 5, 2021
महत्वाच्या बातम्या