मोठी बातमी : भारताच्या कुटनीतीचा विजय, हाफिज सईदला बेड्या

टीम महाराष्ट्र देशा : मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला पाकिस्तानात बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यामुळे भारताच्या कुटनीतीचा मोठा विजय झालेला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने पाकिस्तानवर दबाव टाकला होता. त्यानंतर पाकिस्तानातील लाहोरमधून त्याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्याने भारताविरुद्ध अनेक दहशतवादी कारवाया केल्या आहेत.

दरम्यान, यापूर्वीही त्याला दोन वेळा अटक झाली होती. परंतु सबळ पुराव्याभावी त्याची सुटका करण्यात आली होती. परंतु आता त्याला पुन्हा एकदा बेड्या ठोकण्यात आली आहे.