fbpx

पुण्यात गिरीश बापटांचीचं ताकद, कॉंग्रेसचे मोहन जोशी ३ लाख मतांनी पराभूत

टीम महाराष्ट्र देशा : पुणे लोकसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे भाजप उमेदवार गिरीश बापट विजयी झाले आहेत. बापट यांनी तब्बल तीन लाख मतांनी कॉंग्रेसचे मोहन जोशी यांचा पराभव केला आहे. बापट यांच्या विजयानंतर कसब्यात कार्यकर्त्यांनी जल्लोष करत विजय साजरा केला आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघात यंदा केवळ ४९ टक्के मतदान नोंदवण्यात आले होते, त्यामुळे घटलेल्या मतदानाचा फटका कोणाला बसणार याची चर्चा पुण्यात होती. उमेदवार जाहीर करण्यापासून सुरु असणारा कॉंग्रेसचा गोंधळ निकालापर्यंत पहायला मिळाला आहे. दुसरीकडे भाजपने शिस्तबद्धपणे प्रचार यंत्रणा राबवत आघाडी घेतली होती. अखेर पुण्याचे कारभारी होण्याचा मान बापट यांनाच मिळाला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील विजयी उमेदवार

हातकनंगले – धैर्यशिल माने ( शिवसेना )

कोल्हापूर – संजय मांडलिक ( शिवसेना )

सातारा – उदयनराजे भोसले ( राष्ट्रवादी कॉंग्रेस )

सांगली – संजय काका पाटील ( भाजप )

बारामती – सुप्रिया सुळे ( राष्ट्रवादी कॉंग्रेस )

शिरूर – अमोल कोल्हे ( राष्ट्रवादी कॉंग्रेस )

सोलापूर – डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी ( भाजप )

मावळ – श्रीरंग बारणे ( शिवसेना )

माढा – रणजीतसिंह निंबाळकर