मुंबई : महाराष्ट्रात राजकीय खेळाला कलाटणी मिळताना दिसत आहे. शिंदे गटात फूट पडल्याची बातमी समोर आली आहे. दुसरीकडे, केंद्र सरकारने सर्व बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना सीआरपीएफ सुरक्षा देण्याची घोषणा केली आहे. आता कुटुंबांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. सायंकाळपर्यंत १५ बंडखोर आमदारांच्या घराबाहेर सीआरपीएफ चे (CRPF) जवान तैनात करण्यात येणार आहेत.
यापूर्वी बंडखोर आमदारांनी आरोप केला होता की, त्यांच्या ३८ आमदारांच्या कुटुंबीयांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हे तथ्यहीन असल्याचे म्हटले होते. सुरक्षा परत घेऊन त्यांना मुसेवाला बनवण्याचा डाव असल्याचा आरोप बंडखोरांनी केला होता. अशा परिस्थितीत आता बंडखोर आमदारांना केंद्राची सुरक्षा देण्यात आली आहे.
मुंबई, नागपूरसह अनेक शहरांत शिंदे यांच्या विरोधात निदर्शने
महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक रविवारी रस्त्यावर उतरून एकनाथ शिंदे यांचा निषेध करत आहेत. मुंबईतील सामना कार्यालयाबाहेर शिवसैनिकांची गर्दी आहे. नागपूर आणि नाशिकमध्ये बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. भगवे झेंडे घेऊन रॅली काढण्यात आल्या असून शिंदे गटाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<