fbpx

कॉंग्रेसला मोठा झटका, नांदेड कॉंग्रेसच्या बालेकिल्याला भाजपचा सुरंग

टीम महाराष्ट्र देशा :साऱ्या देशाचे लक्ष २३ मे च्या निकालाकडे आणि देशात कोणाचे सरकार येणार याकडे लागले होते. ही प्रतीक्षा संपली असून, नांदेडमध्ये भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे.

कॉंग्रेसचे उमेदवार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात ही लढत झाली असून, प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांचा पराभव करत विजय मिळवला आहे.

विशेष म्हणजे नांदेड लोकसभा मतदार संघ हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु यंदाच्या निवडणुकीत भाजपने कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरंग पडला आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कॉंग्रेसने केवळ दोन जागांवर विजय मिळवला होता. त्यामध्ये नांदेड मधून अशोक चव्हाण तर हिंगोली मतदार संघातून राजीव सताव यांचा समावेश आहे. २०१४ च्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या विरोधात भाजप कडून बी.डी. पाटील यांनी उमेदवारी लढली होती. आणि यंदाच्या निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी देण्यात आली होती.

त्यामुळे यंदाची निवडणूक अशोक चव्हाण यांना अडचणीची गेली असून प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाणांचा पराभव करत आपला झेंडा फडकवला आहे.