धाराशिव (उस्मानाबाद )चा गड कोण राखणार?

mp ravindra gayakwad, sujitsinh thakur, mla dilip sopal & padmsinh patil

सोलापूर- आगामी लोकसभा निवडणूकीत धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा गड कोण जिंकणार याकडे लक्ष लागलेले असून आगामी हि निवडणूक चुरशीची होणार यात काही शंका .

लोकसभा निवडणूकीला एक वर्ष बाकी असले तरी सध्या मोर्चेबांधणीला वेग आलेले आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात २०१४ लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये उस्मानाबादची जागा राष्ट्रवादीकडे होती, तर शिवसेना-भाजप युतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे होती. परंतु सध्या राज्यातील चित्र वेगळे आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आगामी निवडणूका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यामुळे भाजपकडून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागून राहिलेले आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणूकीत शिवसेना-भाजप महायुतीकडून सध्याचे विद्यमान खासदार रविंद्र गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे पद्मसिंह पाटील यांचा पराभव केला होता. तर २००९ च्या निवडणुकीत पद्मसिंह पाटील यांनी खासदार रविंद्र गायकवाड यांचा पराभव केला होता. उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील मतदारांनी आजवर कॉंग्रेस आणि शिवसेना उमेदवारांना कौल दिला आहे, शिवसेनेकडून माजी खासदार शिवाजी कांबळे यांनी दोन टर्म, तर कल्पना नरहिरे यांनी एका वेळेस येथून प्रतिनिधित्व केले आहे. विद्यमान खासदार रविंद गायकवाड यांनी आजवर दोन टर्म शिवसेनच्या तिकिटावर विजय मिळवला आहे.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात प्रथम कॉंग्रेस आणि पुढे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्राबल्य आहे. माजी खासदार पद्मसिंह पाटील आणि पुत्र आ राणाजगजितसिंह पाटील यांनी उस्मानाबाद विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपली पकड मजबूत ठेवली आहे. त्यामुळे २०१९ च्या लोकसभेसाठी पद्मसिंह पाटील अथवा त्यांचे पुत्र राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून दावेदारी होवू शकते, तर सहा टर्म बार्शीचे आमदार असणारे दिलीप सोपल यांचे नाव देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आघाडीवर आहे. मात्र, दिल्लीला जाण्यास सोपल उत्साही नसल्याच बोलल जात आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आधीच आगामी लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढण्याचे घोषित केल्यामुळे शिवसेनेकडून सध्याचे खासदार रविंद्र गायकवाड यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित मानली जात आहे, तर बार्शीचे भाऊसाहेब आंधळकर याचं नावही शिवसेनेकडून चर्चेत आहे. भाजपकडून सध्या संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली असून मुख्यमंत्र्यांचे जवळचे मानले जाणारे विधानपरिषद आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे नाव आघाडीवर आहे, तर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे सुपुत्र रोहन देशमुख हेही उमेदवारीसाठी आग्रही आहेत.  उस्मानाबादचे सुधीर पाटील हेही इच्छुक असल्याच कळतयंं,  मागील वेळी भाजपशी बंडखोरी करत रोहन देशमुख यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती.

भाजपकडून आमदार सुजितसिंह ठाकूर कि रोहन देशमुख यांना उमेदवारी मिळणार हे पाहन महत्वाच आहे, तर मागील विधानसभेला कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याचा फटका राज्यात बसल्याने आगामी निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला आहे, त्यामुळे आघाडीकडून पाटील घरातील व्यक्ती असणार कि आमदार सोपल हे पहाव लागणार आहे.