उद्घाटन रुग्णालयाचं, हजेरी पवार-फडणवीसांची, शक्तीप्रदर्शन नारायण राणेंचं

 पवार, फडणवीस, राणे एकाच व्यासपीठावर

टीम महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे :- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार नारायण राणे हे त्यांच्या पडवे येथील रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या उदघाटन प्रसंगी मोठ्या प्रमाणावरआज शक्ती प्रदर्शन केलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं . यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची उपस्थिती होती .

पडवे येथे नारायण राणे यांनी ‘लाईफ टाइम’ रुग्णालयाची उभारणी केली  असून कोकणवासीयांना उत्तम दर्जाची आरो सुविधा येथे मिळणार आहे.उद्घाटन कार्यक्रमाला  राज्यातील अनेक मंत्री, नामांकित डॉक्टर, उद्योगपती या कार्यक्रमाला हजेरी लावली . लाईफ टाइम’ हे ६५० बेडचे असून सुरुवातीला ३०० बेडचे उद्घाटन होणार असल्याचे राणे यांनी सांगितले.

रुग्णालयात अत्याधुनिक मशिनरी असून माफक दरात उपचार दिले जाणार आहे. ओपीडीचे शुल्क १० रुपये तर डायलिसिससाठी ३५० रुपये शुल्क घेण्यात येणार आहे. प्रसूती करताना सिझर करावे लागल्यास १५ हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याचे राणेंनी सांगितले. रुग्णालयाच्या उद्घाटनाच्या अनुषंगाने आपले स्वप्न साकार होताना समाधान लाभत असल्याचे राणेंनी म्हटले आहे. एकूणच नारायण राणेंचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.