Breaking News : जगप्रसिद्ध गेम ‘PUBG’ सह ११८ ऍप्सवर बंदी!

नवी दिल्ली : भारत-चीन तणाव गेले अनेक महिने वाढतच असून चीनच्या कुरघोडी अजूनही सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर भारताने आत्मनिर्भरतेच नारा लगावत चिनी वस्तूंसह ऍप्सवर डिजिटल स्ट्राईक करण्यास सुरुवात केली होती. याआधीच टीकटॉक, शेअर इट सारख्या १०० हुन अधिक ऍप्सवर सुरक्षिततेचा ठपका लावत बॅन करण्यात आले होते.

आता, केंद्रीय माहिती संचनालाय आणि तंत्रज्ञान विभागाने आणखी एक मोठे पाऊल उचलले असून जगातील सर्वात लोकप्रिय गेम्स पैकी एक असलेल्या पबजी(PUBG) सह इतर ११८ ऍप्सवर बंदी आणली आहे. यामुळे देशातील करोडो युवकांसह गेमर्सना धक्का बसला आहे. याबाबत ANI ने न्यूज दिली आहे.

नागपूर महापालिकेतील ‘मुंढे’ करंट कायम, नवीन आयुक्तांनी बजावली ६६ कर्मचाऱ्यांना ‘शो कॉज’ नोटिस

तुकाराम मुंढेंनंतर आता कर्तव्यदक्ष नांगरे पाटलांची बदली

दरम्यान, पबजीवर उपजीविका करणाऱ्या गेमर्सची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. याआधी बॅन करण्यात आलेल्या टीकटॉकवर देखील अनेक युवक पैसे कमवून उपजीविका करत होते, मात्र चीनच्या उत्पातानंतर देश आधी अशी भूमिका घेत समर्थन दिले होते. आता, पबजीचे व्यसन असलेल्यांसाठी देखील हा जबर धक्का मानला जात आहे. पबजी गेमवरून अनेक पालक हैराण झाले होते, त्यांना मात्र आता हा दिलासा मिळाला असून युवकांनी नैराश्यात कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये हेच आवाहन टीम महाराष्ट्र देशातर्फे आम्ही करत आहोत.

काँग्रेसच्या ‘त्या’ नाराज नेत्यांनी भाजपा, आरपीआयमध्ये यावं : रामदास आठवले