राष्ट्रवादीचा ‘हा’ तरुण आमदार करणार भाजपात प्रवेश ?

टीम महाराष्ट्र देशा- निवडणुका जवळ येऊ लागताच पक्षांताराला वेग येतो तर काही नेते आगोदरच पक्षबदल करून निवडणुकीची तयारी करतात. सध्या राज्यात हळूहळू निवडणुकांचे वारे वाहू लागले असून नेतेमंडळी सर्व शक्यतांचा विचार करून पक्ष बदल करू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण आमदार निरंजन डावखरे हे भाजपात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते वसंतराव डावखरे यांचे सुपुत्र असणाऱ्या निरंजन डावखरे यांची पक्षातील आव्हाड -परांजपे या स्थानिक नेत्यांकडून कोंडी केली जात असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दैनिक लोकमतने या संदर्भातील वृत्त दिले आहे. निरंजन डावखरे हे सध्या कोकण पदवीधर मतदार संघातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. आमदारकीची टर्म संपत आलेली असतानाच पक्षात कोंडी होऊ लागल्याने ते अस्वस्थ असल्याचे सांगितले जाते. त्यातूनच ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात आले. त्यांच्या पक्षांतरांचा मुहूर्त पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा ठरविण्यात आल्याने त्याचा फटका काँग्रेसला तर फायदा भाजपाला होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जाहीर सभेत निरंजन डावखरे प्रवेश करतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
उद्धवची आणि संज्याची औकात काढली त्याबद्दल उदयनराजेंच अभिनंदन:निलेश राणे
संज्या म्हणजे लुक्का;संज्या राऊत म्हणजे 'पिसाळलेला कुत्रा':निलेश राणे
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
'अजित पवार हे सध्याच्या मंत्रिमंडळातील अत्यंत कार्यक्षम मंत्री असून ते  कामाला वाघ आहेत'
नितेश राणेंची जीभ घसरली संजय राऊतांवर केली अश्लाघ्य भाषेत टीका
'हा देश मोदी आणि अमित शाह यांच्या बापाचा नाही'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का
छत्रपतींच्या घराण्याचा अपमान सहन करणार नाही, आज सातारा बंद