Breaking : पुण्यातील राष्ट्रवादीच्या आमदाराला कोरोनाची लागण !

ncp

पुणे : गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला संबोधित करत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत.

गेल्या १ वर्षांपासून कोरोनानं जगभरात थैमान घातलं आहे. या कालावधीत अनेकांना कोरोनाची लागण झाली तर काही जणांनी यामुळे आपले प्राणही गमावले. त्यातच आता राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्या आधीच अनेक राजकीय नेते विशेषतः महाविकास आघाडीतील मंत्री अचानक कोरोनाग्रस्त होऊ लागले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री व नेते एका पाठोपाठ एक असे कोरोनाच्या विळख्यात सापडले असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. ‘नमस्कार, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत चांगली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू असून काळजी नसावी. मागील दोन-तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. शक्य होईल तितके कामकाज व्हर्चुअल करण्याचा प्रयत्न आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क, सॅनिटायझर चा नियमित वापर करावा,’ असं आवाहन देखील चेतन तुपे यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या